
पारनेरचे शाम खामकर यांचा काव्यसंग्रह प्रथम, तर काव्यलेखनात ज्ञानेश्वर भामरे आणि वैशाली माळी प्रथम
नाशिक (प्रतिनिधी) दि.१ नाशिक कवी राज्यस्तरीय काव्यपुरस्कार जाहीर करण्यात आलेले असून रविवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण होणार आहे. राज्यस्तरीय काव्य पुरस्कार पुढील प्रमाणे काव्यसंग्रह मेणबत्त्यांच्या मशाली कवी शाम खामकर, पारनेर प्रथम तर कवयित्री प्राजक्ता पटवर्धन, पुणे यांचा निव्वळ योगायोग द्वितीय, तृतीय डॉ.माधुरी चव्हाण-जोशी, यांचा कॅलिडोस्कोप तर शिरपूरचे कवी अरविंद भामरे, यांच्या शापित कोलाहलाच्या नोंदीला उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुक्तछंद काव्यलेखन स्पर्धेचे विजेते आहेत कवी ज्ञानेश्वर भामरे, शिरपूर प्रथम, कवयित्री कल्पना म्हापुसकर, मुंबई, द्वितीय तर तृतीय पुरस्कार कवी देवेंद्र इंगळकर, मुंबई आणि उत्तेजनार्थ कवयित्री डॉ.कीर्ती जाधव,पुणे यांना जाहीर झाला आहे. छंदोबद्ध काव्यलेखन स्पर्धेत कवयित्री वैशाली माळी, पुणे, कवी ऋषभ कुलकर्णी, छ.संभाजीनगर, कवयित्री अनिता बोडके, नाशिक, कवयित्री रेणुका जोशी. छ.संभाजीनगर यांना पुरस्कार मिळाले आहेत. नाशिक कवीचे माजी अध्यक्ष कै.प्रा.डॉ.सुरेश मेणे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कार वितरण नाशिकचे ज्येष्ठ गीतकार, मिलिंद गांधी यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण होणार असून अध्यक्षस्थानी नाशिक कवीचे अध्यक्ष इंजि. बाळासाहेब मगर असतील, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामान्यप्रशासन विभागाचे तहसीलदार प्रदीप वर्पे, उद्योजक उद्धव आहेर, आर्की. चंद्रकांत धामणे, ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक विलास बिरारी आणि कलाप्रेमी श्रीनिवास मेणे हे उपस्थित राहणार आहे. याच दिवशी सकाळी शालेय विद्यार्थ्यासाठी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून भावबंधन मंगल कार्यालयात सकाळी नऊ वाजेपासून या स्पर्धा होतील. दुपारी दोन वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे या दोन्हीही कार्यक्रमाला सर्व काव्यप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन नाशिक कवीचे कार्याध्यक्ष सुभाष सबनीस, उपाध्यक्ष बाळासाहेब गिरी, कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे आणि कार्यकारिणी सदस्य स्मिता बनकर , अलका कुलकर्णी, अजय बिरारी, भारती देव, किरण मेतकर, राजेश जाधव, प्रांजली आफळे आणि सुरेश चौरे यांनी केले आहे.


