
सिन्नर (.प्रतिनिधी ) सिन्नर शहर व तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ,युवक वर्ग, शेतकरी कामगार,मजूर, डॉक्टर, वकील इंजिनियर शिक्षक आणि शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व तरुण मित्रांनो उद्या दिनांक 9/7/2026 सकाळी गोंदे फाटा येथे 8.30 वाजेपर्यंत सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. आपल्यासाठी तसेच भावी पिढीसाठी, नाशिक पुणे जाणारी रेल्वे ही सरळ मार्गाने जाण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. त्यासाठी संगमनेर सिन्नर, नाशिक, नारायणगाव आळाफाटा, मंचर चाकण पुणे, नोकरीसाठी गेलेल्या मुला मुलींना सुद्धा आपण फोन करून सांगायचं आहे. उद्या सुट्टी आहे तुम्ही आंदोलनात सामील व्हा. घरच्या ज्येष्ठ मंडळीने आपल्या मुलांना सांगायचं आहे. आपण या आंदोलनात सामील व्हावं. ही रेल्वे आता नाही झाली तर कधीच होणार नाही. कारण ही दुसऱ्या मार्गाने पळवण्यासाठी बराच खटाटोप चालू आहे. पण मागणी आपली बरोबर आहे रास्त आहे तेव्हा उद्याच्या आंदोलनास सहभागी व्हायचं आहे
नाहीतर अशा पण प्रतिक्रिया येतात मला काय करायचं, मला एकच पोरगा आहे, तो शेती करणार आहे, तो कुठे बाहेर शिकायला जाणार आहे, होळीचा शिकणार आहे, नोकरी लागली तर तो इथेच करणार आहे, हे सगळं विसरा आणि नवीन पिढीचा विचार करा आणि उद्याच्या आंदोलनात सहभागी व्हा.

