
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३५६ वा दिवस

यापुढे फक्त विधायक कामांना चालना द्यायची आहे. काही प्रसंगी कठोर टीका जरुरी असते पण ती काही काळच, सुयोग्य मार्ग मिळेपर्यंतच, गेल्या असंख्य वर्षांपासून फक्त टीकेचाच महापूर वाहत आहे भारतीयांच्या वैगुण्यावर पाश्चात्त्य बुद्धिवंतांनी भौतिक उपभोगवादी संस्कृतीने तोंडसुख घेतले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आपल्यातल्या चांगल्या गोष्टींपेक्षा आपले दोषच फक्त समोर येत आहेत. आता हे पुरे झाले. मी आपणास विधायक मार्ग दाखवणार आहे. जे विघातक आहे ते विसरून जा. टीका, टिप्पणी, निंदा, द्वेष करण्याचा काळ आता संपला आहे. आपण सारे मिळून शिक्षणात, ज्ञानात आणि सामाजिक विकासात सुधारणा घडवून आणू या. आपल्या समाजाची विस्कळीत समाजशक्ती एकत्र करून त्यात एकसूत्रीपणा आणू या!
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण १७ शके १९४८
★ आषाढ वद्य /कृष्ण १०
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. ८ ऑगस्ट २०२६
★ १९३२ सुप्रसिध्द मराठी अभिनेते, संवाद लेखक, निर्माते, दिग्दर्शक दादा कोंडके यांचा जन्मदिन.
★ १९४२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईच्या गोवालिया टँक (ऑगस्ट क्रांती) मैदानावर “चले जाव” चा ठराव मंजूर केला.

