
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३१४ वा दिवस
चांगले आणि वाईट ही एकमेकांशी अगदी अच्छेद्यपणे निगडित आहेत एक घेऊ जाता दुसरीही स्वीकारावेच लागते. या जगतातील समस्त शक्तीची गोळाबेरीज वा समष्टी एखाद्या तलावासारखी आहे त्यात उठणाऱ्या प्रत्येक लाटेबरोबरच अगदी अपर्यायपणे तदनुरूप एक खळगाही पडत असतो, गोळाबेरीज अगदी पूर्णतया सारखीच असते. म्हणून एका जणाला सुखी करणे म्हणजे दुसऱ्या एखाद्याला दुःखी करणे होय. बाह्य सुख हे केवळ जड सुख असते आणि त्याचे प्रमाण ठराविक आहे म्हणून सुखाचा एक कणदेखील मिळवायचा असल्यास तो दुसऱ्याकडून हिसकावून घेतल्याशिवाय मिळावयाचा नाही. ह्या जड जगताच्या पलीकडे जे सुख आहे तेच केवळ असे सुख आहे की जे दुसऱ्या कुणाचे काही नुकसान न करताही मिळवता येणे शक्य आहे. जडसुख हे जड दुःखाचेच केवळ एक रूपांतर होय.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय आषाढ ६ शके १९४८
★ जेष्ठ शुध्द /शुक्ल १३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. २७ जून २०२६
★ १७०८ मराठा साम्राज्याचे पराक्रमी सेनापती धनाजी जाधव यांचा जन्मदिन
★ १८३८ सुप्रसिद्ध बंगाली कादंबरीकार, लेखक, पत्रकार, ‘आनंदमठ’ कादंबरीत वंदे मातरम राष्ट्रीय गाण रचणारे कवी बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचा जन्मदिन.
★ १८८० अंध-मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका शिक्षिका हेलन केलर यांचा जन्मदिन
★ २००८ भारताचे फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांचा स्मृतिदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

