
नाशिक- २८ (बातमीदार..) हृदयातून येणारं काव्य हे रसिकांच्या मनाचा ठाव घेते आपल्या प्रकृतीधर्माप्रमाणे लिहीलेले खरं काव्य आहे. मराठी कविता ही संत ज्ञानेश्वरांनी सुरु केली तर संत तुकारामांनी ती आपल्या पर्यंत पोहोचवली. वेगवेगळ्या कवींच्या कविता काळानुरुप बदलत गेल्या. तसेच कवींनी वेदना व्यथांसोबत जुन्या कवितांकडे पाहाणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका अलकाताई दराडे यांनी केले. त्या नाशिक कवी या संस्थेच्या दर महिन्याला आयोजित केल्या जाणाऱ्या कवी संमेलनाते प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. नाशिक कवीचे कार्याध्यक्ष सुभाष सबनीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उल्लेखनीय कविता सादर करणारे कवी भूपाल देशमुख, सुधाकर भामरे, माणिकराव गोडसे, रमेश चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अजय बिरारी, स्मिता बनकर, सुहास टिपरे, रविकांत शार्दूल, काचेश्वर गुंडेश्वर, सुनील गायकवाड, अभय शिर्के, वाळू आहेर, मनीष वैद्य, रंजन कापडणीस, मगनलाल बागमार, रंगराज डेंगळे, योगेश जाधव, वैशाली सुर्यवंशी, सम्राज्ञी सूर्यवंशी,संजय आहेर या कवींनी कविता सादर केल्या. नाशिक कवीचे सर्व पदाधिकारी, कवी आणि काव्य रसिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. सुत्रसंचलन नंदकिशोर ठोंबरे यांनी केले.

