
सिन्नर ( प्रतिनिधी)२८ जून २०२६ राष्ट्र संत कबीर यांची जयंती महामित्र परिवार,संविधान प्रेमी व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथील शिवाजी महाराज चौक येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व संत कबीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी
संत कबीर हे महान समाज सुधारक, संत साहित्याचे शिल्पकार कवी व मानवतावादी विचारांचे प्रचार व प्रसारक होते. त्यांनी आपल्या दोह्यांमधून स्वातंत्र्य,समता बंधुतेचे तत्त्वज्ञान मांडले असे सांगितले. तर स्तंभ लेखक प्रा.प्रभाकर चतुर सर यांनी आपल्या मनोगतात
राष्ट्रसंत. कबीर महाराज हे मानवतावादी ,निसर्गवादी,विज्ञानवादी ,समाजसुधारक संत होते. ते धार्मिक थोतांडावर कडक आसूड ओढणारे आणि हजारो ग्रंथांचे पांडित्य खुजे करणाऱ्या प्रेमाच्या अडीच अक्षराचा मंत्र सांगणारे पुरोगामी संत होते. त्यांनी तत्कालीन प्रचलित असणाऱ्या धर्मांतील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा यावर दोह्याच्या माध्यमातून सडकून टिका केली. सरांनी तथा गौतम बुद्ध,संत कबीर,शाहू,फुले,आंबेडकर या महापुरुषांचे भारतीय समाज रचनेतील मोलाचे स्थान अधोरेखित केले.संतकबीर हे सत्य विज्ञान व कर्म सिद्धांत यांवर लिहीत असत त्यांच्या लिखाणामुळे ते जगामध्ये प्रसिद्ध झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर यांना गुरु मानले.अशा या महान संतास विनम्र अभिवादन !
या कार्यक्रमाचे सुञसंचलन विजय मुठे,प्रास्ताविक रामु इदे, तर आभार प्रकाश माळी यांनी मानले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे,स्तंभलेखक प्रा.प्रभाकर चतुर सर, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे संस्थापक रामु इदे ,सहसंस्थापक विजय मुठे, प्रकाश माळी,धनंजय परदेशी, राजेंद्र देशमुख, मनोज माळी,संजय देशमुख नामदेव कुटे ,विलास ताडगे, अनिल ठाणेकर, लाढे गजीव,भगवान पाचोरे, योगेश सोनवणे,राजेंद्र सातपुते, बबन गोळेसर सोमनाथ लोहारकर उपस्थित होते.

