
:

उपस्थित जनसमुदाय
राजाभाऊ वाजे यांचा सत्कार एक ऐतिहासिक क्षण…..बाळासाहेब थोरात
सिन्नर प्रतिनिधी (श्यामसुंदर झळके)खासदार राजाभाऊ वाजे यांचा नागरी सत्कार म्हणजे सिन्नरच्या भूमीतील ऐतिहासिक क्षण आहे असे गौरवोद्गार राज्याचे माजी कृषी तसेच महसूल मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले.सिन्नर येथील तालुका नागरी सत्कार समिती तर्फे आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.व्यासपीठावर तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे,नाशिकचे माजी आमदार ॲड.विलासराव लोणारी,कवी नितीन चंदनशिवे सत्कारमूर्ती खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राजर्षी शाहू महाराज,स्व.बाळासाहेब ठाकरे,गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमांना अभिवादन करून झाली. आपल्या भाषणात बाळासाहेब थोरात यांनी वाजे घराण्याची राजकीय,सामाजिक सांस्कृतिक ,शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाचे महत्व विषद करून त्यांच्या निःस्वार्थ,सेवाभावी कार्याचा गौरव केला.त्यांचा समृद्ध राजकीय,सामाजिक वारसा राजाभाऊ वाजे यांनी पुढे नेला.सर्व सामान्य माणसांना मदत करण्याची तसेच पक्ष निष्ठा कशी असते याचा वस्तुपाठ राजाभाऊंनी घालून समाजासमोर आदर्श निर्माण केला. अनेक प्रलोभने व कोटींची ऑफर देऊनही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी मतदारांचा विश्वास सार्थ ठरवला. मतदारांशी प्रतारणा न करणारा व सुसंस्कृत राजकारणी व समाजसेवक म्हणून राजाभाऊ यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे.लोकशाही व संविधान वाचवण्याचे काम त्यांनी केले.हा सिन्नरकरांनी व नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आपला उमेदवार विकाऊ नसून मतदार व पक्षाशी एकनिष्ठ आहे हे दाखवून दिले असे गौरवोद्गार थोरात यांनी काढले. ठाकरे गटातील सहा खासदारांनी उबाठाला सोडचिठी देऊन आपली निष्ठा विकली परंतु कोट्यावधींची ऑफर नाकारून पक्ष व मतदारांशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी त्यांना सन्मानपत्र देऊन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर ,विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी राजाभाऊ यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.कवी चंदनशिवे यांनी भीमराव कांबळे ही प्रबोधनात्मक कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली तसेच आपल्या भाषणात खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नि:स्वार्थी व सेवाभावी,एकनिष्ठ व्यक्तिमत्वाची प्रशंसा केली.माजी आमदार विलासराव लोणारी यांनी राजाभाऊ वाजे यांच्या निर्णयाचे स्वागत करून आपल्या मताचे चीज झाले असे प्रतिपादन करून ,वाजे घराण्याच्या दातृत्वाची माहिती दिली.ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांनी आपण दिलेला सल्ला व शिकवण,संस्कृतीचा आपल्या मुलाने आदर करून पक्षाशी गद्दारी न करता मतदारांचा विश्वास वृद्धिंगत केला याचा सार्थ अभिमान वाटतो असे गौरवोद्गार काढले.सरकारास उत्तर देताना राजाभाऊ वाजे यांनी आपल्या वाजे घराण्याची परंपरा,शिकवण,संस्कृती व वडिलांनी दिलेला सल्ला मानून मतदार व पक्षाशी इमान राखणे याचा अभिमान वाटतो. यापुढेही मी उद्धव ठाकरे यांच्याशी नेहमी एकनिष्ठ राहील याची ग्वाही दिली.

