
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३१६ वा दिवस
स्वतःचा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे ही तुमची प्राथमिकता असली पाहिजे. तुमचे जीवन सुंदर, समृद्ध, सफल व सार्थक व्हावे. मानवतावादी विचारांसाठी तुम्ही सतत प्रयत्न करावा ही तुमची अतःप्रेरणा असावी. आज या घटकेपासून तुम्ही निर्धार करा, स्वतःला कमकुवत विचारांपासून सतत दूर ठेवाल आणि मनात समृध्द व सकारात्मक विचार सतत तेवत ठेवाल. यामुळे तुम्हाला सुख, शांती, समृद्धि मिळेल, पर्यायाने, तुमची इच्छित फलप्राप्ती होईल. कितीतरी लोक धनाने श्रीमंत असतात; पण विचाराने दरिद्री असतात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय आषाढ ८ शके १९४८
★ जेष्ठ पौर्णिमा
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. २९ जून २०२६
★ २०१० प्रख्यात वक्ते, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा स्मृतीदिन.

