
अस्मिता खेलो इंडिया अंतर्गत रग्बी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्यासाठी मैदानावरील खेळासोबत मैत्री आवश्यक असून रग्बी खेळात असलेल्या चापल्य ,धाडस व शारीरिक क्षमतेची कसोटी लागते त्यामुळे उत्तम खेळाडू निर्माण होतो त्यासाठी मैदानावर सतत कार्यरत रहा असे आवाहन जेष्ठ क्रिडा शिक्षक व माजी प्राचार्य राजेंद्र सोमवंशी यांनी केले.

अस्मिता खेलो इंडिया अंतर्गत जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

गुरुवार दिनांक 27- 8- 2016 रोजी क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व नाशिक जिल्हा रग्बी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.स्पर्धैसाठ रग्बी असोसिएशन चे अध्यक्ष संजय चव्हाण सर व सेक्रेटरी मनोज कनोजीया यांनी मार्गदर्शन केले.
अस्मिता खेलो इंडिया आयोजित मिनाताई ठाकरे स्टेडियम पंचवटी, नाशिक येथे १५ वर्षे वयोगटात मुलींच्या १२ संघांनी तसेच १२ वर्षे वयोगटात ०८ संघांनी सहभाग घेतला स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन माजी प्राचार्य -कवी राजेंद्र सोमवंशी सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले, याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक सेनेचे सरचिटणीस विनोद हिरे, दिव्यांग शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, बाळकृष्ण घोलप, पुनीत आवटे, विनायक खैरनार प्रतीक कडाळे, रिजवान शेख, अमोल शिंदे, राजेंद्र यशवंते, कृष्णराव शिंदे, अशोक बोराडे, आदींची उपस्थिती लाभली

त्याचप्रमाणे स्पर्धा प्रमुख म्हणून ईश्वर सर, मुंबई आणि पंकज सर, ठाणे तसेच नाशिक जिल्हा रग्बी असोसिएशनचे सेक्रेटरी मनोज कनोजीया सर ,अनिल ढोकणे सर व राम धोंगडे यांचेसह सर्व पदाधिकारी व पंच यांनी काम पाहिले.

