
पिंपळगाव बसवंत — ( प्रतिनिधी ) येथील मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालय पिंपळगाव बसवंत येथे रक्षाबंधन कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
” सेवेप्रती कृतज्ञता ” या संकल्पनेतून विविध क्षेत्रात कर्तव्यदक्षपणे सेवा देणाऱ्या सेवकांमुळे आपण चांगल्या सुविधांचा लाभ घेतो तसेच आपल्याला सेवा मिळतात अशा सेवा देणारे विविध क्षेत्रातील कर्मचारी त्यात पोलीस कर्मचारी राकेश मानकर, डी एस पगारे, बी एम नेहरे , सैनिक त्र्यंबक धुळे , घंटागाडी कर्मचारी, रमेश अहिरे अग्निशामक कर्मचारी, विनायक गवांदे, विकी विधाते , एसटी डेपो कर्मचारी, बागुल साहेब, धीवर साहेब , प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी, विशाल ढिकले,व्यंकटराव कांबळे , स्वच्छता कर्मचारी, योगेश विधाते , पत्रकार बांधव, हेमंत थेटे, गणेश शेवरे, राजेंद्र पवार या विविध क्षेत्रातील सर्व सेवकांना विद्यालयात आमंत्रित करून विद्यार्थिनींनी या सर्व सेवकांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले. त्यांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करत अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन कार्यक्रम विद्यालयात साजरा करण्यात आला .

यावेळी व्यासपीठावर विविध क्षेत्रातील सेवक बांधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस जी थेटे सर, ज्येष्ठ शिक्षिका सरला डंबाळे मॅडम, वंदना कदम मॅडम उपस्थित होते.
विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री एस जी थेटे सर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संकल्प करून वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी एक राखी पेड के नाम या उपक्रमांतर्गत शालेय परिसरातील सर्व झाडांना राखी बांधत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.
तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी भावा बहिणीचं अतूट नातं जपत रक्षाबंधन विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून राखी बांधत विद्यार्थिनींना भेटवस्तू देऊन विद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्या रक्षाबंधनाची महती कुमारी केसर गागरे पाटील या विद्यार्थिनीने आपल्या मनोगतातून व्यक्त केली .
पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवी ब ची विद्यार्थिनी कुमारी काव्या आहेर हिने केले. फलक लेखन कलाशिक्षिका गायखे मॅडम यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

