
वासोळ (प्रतिनिधी): येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाती उपशिक्षक श्री.निकम एस.के.यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री.केदार एस.एस.होते.सर्व शिक्षकवृंद व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविकातून श्री.आहेर एस.सी.यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. २९ ऑगस्ट हा हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन असून, त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या अद्वितीय हॉकी कौशल्याच्या जोरावर भारताला तीन वेळा ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आरोग्य, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित होते असे त्यांनी सांगितले. खेळ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.आहेर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

