
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३७७ वा दिवस

अहंकार नव्हे, तर आत्मत्याग हेच विश्वातील सर्वोच्च सत्य आहे. आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ होतो. आजच्या जगातले धर्म हे निर्जीव विडंबनाच्या रुपाचे बनले आहेत. जगाला आज जर कशाची गरज असेल तर ती चारित्र्याचीच होय. निःस्वार्थ प्रेमाने ज्यांची जीवने प्रज्वलित झाली आहेत अशा लोकांची, सत्याचे अधिष्ठान ज्यांच्या ठायी आहे अशा लोकांची. सत्य, प्रेम, करुणा ज्यांच्या हृदयात असेल त्यांचा प्रत्येक शब्द वज्राप्रमाणे बलशाली व प्रभावी होईल. बुध्दीचातुर्यने यश मिळेलही मात्र विशाल ह्रदयाने शाश्वत विजय प्राप्त होईल. यावर विश्वास ठेवा. प्रेमाने जग जिंकता येते द्वेषाने नाही.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास ७ शके १९४८
★ श्रावण वद्य /कृष्ण १
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. २९ ऑगस्ट २०२६
★ १८८० लोकनायक माधव श्रीहरी अणे यांचा जन्मदिन.
★ १८९१ सायकल चे शोधक पियरे लेलेमेंट यांचा स्मृतीदिन
★ १९०५ भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन “राष्ट्रीय क्रीडा दिन”
★ १९६९ लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ‘शाहीर अमर शेख’ यांचा स्मृतीदिन
★ भारतीय क्रीडा दिन.

