
नाव: भागवत कोंडाजी जगताप
जन्मदिन :01/01/1945
तसेच 26/.08/2026 रोजी निसर्गात विलीन झालेत
गाव: धोंडबार तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक त्यांचा जन्म डोंगरदऱ्यात बसलेलं धोंडबार या आदिवासी गावात झाला .या गावी 1 जानेवारी 1945 साली सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला .त्यांचे वडील कोंडाजी येसु जगताप हे करारी आणि त्या काळचे मोठे शेतकरी होते . गाई, गुरे ही त्यांची संपत्ती होती . भागवत जगताप हे कोंडाजी बाबा यांचे पहिला चिंरजीव असल्याने लाडके होते तेव्हा त्या काळात शिक्षनाचे प्रमाण खूप कमी होते.पण कोंडाजी बाबा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीशी जोडलेले असल्याने त्यांनी मुलाला शिकवायचे ठरवले त्या काळी शिक्षण हे कमी असल्यामुळे त्यांनी भागवत जगताप यांना वयाच्या 9व्या वर्षी शाळेत दाखल केले आणि ते 3रीत असताना मार्च 1956 साली त्यांचा विवाह काळू मोरे यांची कन्या लीलाबाई हिच्याशी त्यांचा विवाह झाला कोंडाजी बाबा डॉ.बाबासाहेब यांच्या चळवळीशी जोडलेले असल्याने 14ऑक्टोबर 1956 रोजी जेव्हा बाबा साहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला तेव्हाच जगताप कुटुंबीयांनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि सिन्नर या पश्चिम भागात आगसखिंड ह्या गावात भागवत जगताप व लीलाबाई जगताप यांचं पहिलंच बौद्ध पद्धतीने झालेला पहिला विवाह ठरला त्यानंतर गावातील शाळा चांगली नसल्यामुळे कोंडाजी बाबांनी त्यांना मुंबई ला चुलता – चुलतीकडे पाठवले तिथ त्यांनी 4थी पूर्ण केली परंतु त्यांचीही परिस्थितीही बेताची होती त्यामुळे त्यांना त्यांच्या बहिणीने इगतपूरी ला शाळेत टाकले तिथ त्यांनी 11वी म्हणजे जुनी मॅट्रिक पूर्ण केली त्यावेळी हे शिक्षण म्हणजे खूप मोठ होते त्यांनी नुसत शिक्षण घेतलं नाही तर त्यांना त्या शिक्षणाच्या जोरावर शिक्षक होण्याची संधी चालून आली होती परंतु घरच्यांच्या नकारामुळे ती नाकारली. त्यानंतर त्यांनी वडील व चुलते यांच्या मार्गदर्शनाखाली शेती केली .शेती चांगली पिकत असल्यामुळे त्यांना नोकरी ची गरज पडली नाही. शेती सुरळीत चालली असताना काळ ओढवला आणि कोंडाजी बाबा यांचे निधन झाले. त्यानंतर भागवत जगताप यांच्यावर त्यांचे 3 भाऊ व 3 बहिणी आणि त्याच सोबत चुलता चुलती यांना अपत्य नसल्यामुळे त्यांचीही जबाबदारी भागवत जगताप यांच्यावर पडली त्यानंतर ते शेतीत रमले त्यांच्या सोबत एक भाऊ शेती करत होता तर दुसरा छोटा भाऊ मुंबई ला नोकरी करत होता हे शेती आणि घर सांभाळत तर छोटा भाऊ मुंबई ला नोकरी करून घरातली अर्थिक बाब सांभाळत.अस चांगलं चालत असताना छोटे बंधू अनिल जगताप हे आजारी पडले आणि त्यातच त्यांचे निधन झाले त्यानंतर भागवत जगताप हे निराधार झाले आणि त्यानंतर पूर्ण जबाबदारी ही भगवत जगताप यांच्यावर आली मुलही लहान होते त्यांना 3 मुली जिजाबाई, सुनंदाबाई आणि लताबाई आणि 2मुले तातू जगताप आणि सुनिल जगताप अशी 5 अपत्य आहेत आणि वृद्ध झालेलं चुलता व चुलती आणि आई परंतु अशा परिस्थितीत ही त्यांनी सगळ अगदी उत्तम पद्धतीने सांभाळलं सर्वांना आपलस करून ठेवलं त्यांचा भाऊ नसतानाही त्यांनी त्यांच्या मुला मुलीला भावजाई यांना अंतर दिले नाही. परिस्थितीत ढासळली आणि संपूर्ण जबाबदारी जरी अंगावर पडली तरी ते फक्त घरापुरते मर्यादित राहिले नाही ते सामाजिक कार्यात, राजकीय क्षेत्रात कार्यरत राहिले आणि धोंडबार विविध कार्यकारी सोसायटी मध्ये चेअरमन या पदी निवडून आले आणि कार्यरत झाले तिथेही त्यांनी मदतकार्य सुरू ठेवलं .कोणी अडलेले असो वा अडाणी कधीही कोणाला अडवून ठेवले नाही ज्यांना कळत नाही त्यांना समजावून सांगितले आणि प्रात्यकाच्या विकास कार्यात मदत करत राहिले.ते शिस्तबद्ध पण प्रेमळ आणि प्रत्यकाला समजून घेणारे असल्यामुळे ते प्रत्यकाचे लाडके होते .गाव ,नातेवाईक,समाजमध्ये त्यांना खूप आदर मान होता .त्यांनी त्यांच्या मुलांनाही अंत्यंत चांगले संस्कार दिले .त्यांना प्रत्यक मार्गावर मार्गदर्शन केले त्यांचे 2 ही मुले सामाजिक कार्यात तसेच राजकारणातही कार्यरत आहेत .त्यांचा मोठा मुलगा तातू भागवत जगताप हे मा. पंचायत समिती सदस्य ह्या पदी मागील 5 वर्ष कार्यरत होते तर दुसरा मुलगा नोकरी करूनही अनेक सामाजिक कार्यात कार्यरत आहे. भागवत जगताप हे काळानुसार चालणारे होते.त्यांची मोठी सून सुरेखा तातू जगताप ही अशा कार्यकर्ती म्हणून काम करत आहे पण ते कधीही बोलले नाही की कशासाठी की का काम करते ते उलट तिला पाठिंबा देत असत. त्यांना गर्व होता की माझी सून परावलंबी नसून स्वतःच्या पायावर उभी आहे .तसेच त्यांनी त्यांच्या नातवंडांनाही नेहमी शिक्षणासाठी प्रेरित केले मग मुलगा असो की मुलगी.त्यांचे मुलींच्या शिक्षणावर जास्त भर होता मुलींनी शिक्षण घेतलेच पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.
त्यांचा परीवारात तसेच सामाजिक कार्यात मोलाचा वाटा आहे अशा व्यक्तिमत्वाला महामित्र परिवार तफॅ भावपूर्ण आदरांजली तसेच अखेरचा स्वाभिमानी जय भिम

