
नाशिक: दि.६ वार्ताहर
माय स्पोर्ट ट्रिप इंडियाचे अंकित दलाल यांच्यामार्फत स्पेनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कॅटलॅन आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेच्या मालिकेत बुद्धिबळातील नाशिक जिल्ह्यातील आंबे दिंडोरीची ग्रामीण भागातील खेळाडू धनश्री अनिल राठी हिची विक्रमी रेटिंगची नोंद झाली आहे. स्पेन येथील पाच स्पर्धेच्या मालिकेत VII ओपन इंटरनॅशनल व्हॅलेन्शिया कुणा बी ग्रुपमध्ये पाचवा क्रमांक प्राप्त करून 190 युरो डॉलर बक्षीस प्राप्त केले. दुसरी स्पर्धा ओबर्ट इंटरनॅशनल सेंड मार्टि सिटीमध्ये खेळून दुसरा क्रमांक प्राप्त केला. व सोबतच 400 युरो डॉलर, ट्रॉफी बक्षीस मिळाले, तिसरी स्पर्धा ओपन इंटरनॅशनल सेंटझिन स्पर्धेत 15 रेटिंगची कमाई केली, चवथी स्पर्धा ओबर्ट इंटरनॅशनल बदलोना स्पर्धेत पण खेळली त्या स्पर्धेत तिने CM फेंड्रिक मायकेल याला हरवले व WCM राजन्या दत्त हिला हरवले होते, पाचव्या स्पर्धेत ओबर्ट इंटरनॅशनल सेंट आंद्रिया येथे WCM लॅम्पु मेरियाना हिला हरवले. तिने सर्व स्पर्धेत 144 रेटिंग वाढवून 1965 रेटिंग प्राप्त करून त्याबरोबर 590 युरो डॉलर्स व ट्रॉफी मिळवून यश संपादन केले. या उच्च यशाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुबई भारतभूमी आल्यावर भव्य स्वागत करण्यात आले. हे सर्व खेळत असताना ती स्वतः इतरांना बुद्धिबळ डी चेस झोन अकॅडमी मार्फत शिकवते व त्या खर्चावर खेळते यापूर्वी तिला अनेक बक्षीस मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडा खेळाडू म्हणून बुद्धिबळाचा पुरस्कार आदरणीय पालकमंत्री गिरीशजी महाजन यांच्या हस्ते 2016 मध्ये सत्कार करून रोख रुपये दहा हजार रुपये व ट्रॉफी मिळाली आहे. आज पर्यंत तिने कॉमनवेल्थ, वर्ल्ड ज्युनिअर, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया स्पर्धा खेळल्या तिच्या यशात तिला ईशानचे अकॅडमीचे अमित गंगाधर तारे यांचे मार्गदर्शन मिळाले. त्याबरोबरच विनोद भागवत सर सिद्धांत गायकवाड मंगेश गंभीरे जयराम सोनवणे सुनीलचे शर्मा सर, संदीप नागरे, प्रथमेश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन पण मिळाले तिच्या यशाबद्दल दिंडोरी तालुक्याचे खासदार भास्कर भगरे सर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे सर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र बागुल सर जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ हर्षल नेहते सर तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुजित कोशिरे , प्राथमिक आरोग्य केंद्र ओझरचे वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली कदम मॅडम, डॉ आनंद सुर्वे डॉ योगेश धनवटे, डॉ प्राची पवार, डॉ मंजिरी सराफ,ओझर माहेश्वरी समाजाचे संजय सारडा ,संतोष लढ्ढा ललित भट्टड, ललित काकानी, नाशिक जिल्हा आरोग्य कर्मचारी वृंद ,आंबे दिंडोरी ग्रामस्थ, हिवताप कर्मचारी पतसंस्थेचे डायरेक्टर पल्लवी कुलकर्णी, डॉ पूर्वा बिर्ला, विजय सोपे नाना, शरद तिडके, सूरज हरगोडे, मयूर चव्हाण, किशोर बावा,जी पी खैरनार दादा, आरिफ नाना मन्सूरी, देसले नाना, प्रा के ओझर सर्व कर्मचारी वर्गाने तिच्या यशाबद्दल सर्व पत्रकार बंधू यांनी तिचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

