
नांदगाव 🙁 प्रतिनिधी ) 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून नमन एज्युकेशन सोसायटी संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, नांदगाव व रेनबो स्कूल, नांदगाव चे संस्थापक श्री.संजय बागुल सर आणि सौ.सरिता बागुल मॅडम यांच्या नेतृत्वाखाली शाळेत ‘छोटे शिक्षक’ हा अभिनव व प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात छोट्या शिक्षकांच्या स्वागत व परिचयाने झाली. यावेळी शाळेतील शिक्षकांनी छोट्या शिक्षकांचा सत्कार करून त्यांचा उत्साह वाढविला. विद्यार्थ्यांनी नाटिकेच्या माध्यमातून ‘शिक्षकांचे महत्त्व’ प्रभावीपणे सादर केले. छोट्या शिक्षकांनी शिक्षक व पालकांचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली, तसेच शिक्षक म्हणून आलेले अनुभव मनोगतातून सांगितले.

विशेष म्हणजे छोट्या शिक्षकांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन अध्यापनाचा अनुभव घेतला. शिक्षकांची जबाबदारी, मेहनत, संयम आणि विद्यार्थ्यांना घडविण्यामागील त्यांचे योगदान याची जाणीव करून देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.
शिक्षक दिनाचा हा आगळावेगळा उपक्रम विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्मरणीय ठरला.

