
सिन्नर (प्रतिनिधी)गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात म वि प्र समाजाचे ज्युनियर विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. के एस शिंदे यांच्या उपस्थितीत इंडक्शन प्रोग्राम संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एन.भवरे यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यासासाठी मार्गदर्शन केले. पंचक्रोशीतील नावाजलेले महाविद्यालय म्हणून हे महाविद्यालय कार्यरत आहे. विज्ञान विभागाचे विद्यार्थी म्हणजे उमलते स्वप्न असते आणि हे स्वप्न तुम्हाला शांत बसू देत नाही ते पुढे जाण्याची प्रेरणा देत राहते तुमचे गोल निश्चित करण्याचं हेच वय आहे. त्यासाठी तुम्ही स्वतः मध्ये कालपेक्षा आज सुधारणा करा .मोठे यश एका दिवसात मिळत नाही परंतु ते एक दिवस नक्की मिळते. अशी प्रेरणा प्रमुख अतिथी डॉक्टर के एस शिंदे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना दिली. विज्ञान विभागाच्या फिजिक्स डिपार्टमेंटने लॅबमधील प्रॅक्टिकल कशा सूक्ष्म पद्धतीने घेतले जाते हे पी.पी. टी च्या. माध्यमातून प्रा. एम पी बहिरट यांनी निदर्शनात आणून दिले. केमिस्ट्री विभाग प्रमुख एस आर कुठे सर यांनी पी.पी.टी .च्या माध्यमातून विषयाचे बारकावे समजावले.बायोलॉजी विभागाचे प्रा. शेळके सर यांनी बायलॉजी या विषयाबद्दल व वर्षभरात होणाऱ्या मविप्र पॅटर्न अंतर्गत परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विविध स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्कॉलरशिपच्या संधी यांचेही मार्गदर्शन केले. ग्रंथालय प्रमुख डॉ. एस बी अहिरे सर यांनी ग्रंथालयात उपलब्ध असलेली विद्यार्थ्यांची अभ्यासक्रमाची पुस्तके व त्याचबरोबर अवांतर वाचनाची पुस्तके यांची सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. एस पी शेलार सर यांनी केले. वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक आर. व्ही पवार सर याप्रसंगी उपस्थित होते. विज्ञान विभाग प्रमुख प्रा. ए. एस गुरुळे प्रा.आर टी सोनवणे व विज्ञान विभागातील सर्व स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. एन पवार मॅडम यांनी केले .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापिका डॉ. एस सी कढणे मॅडम यांनी केले.

