
नाशिक-(प्रतिनिधी )बाळासाहेब मगर यांनी केवळ माझ्या कुटुंबीयांवरच नाही तर संपूर्ण नाशिक वर प्रेम केले. आपल्या गावाशी असलेली नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही. माजी मंत्री डी.एस.आहेर यांचे मित्र मार्गदर्शक म्हणून जी भूमिका बजावली ती मी कधीही विसरू शकत नाही. असे उद्गार आमदार डॉ. राहुल आहेर यांनी काढले ते बाळासाहेब मगर यांच्या श्रध्दांजली सभेत बोलत होते. बाळासाहेब मगर यांच्या विषयी बोलताना ते भावूक झाले होते. या प्रसंगी बोलतांना नाशिक कवीचे कार्याध्यक्ष सुभाष सबनीस यांनी बाळासाहेबांची आठवण चिरंतन रहावी म्हणून यावर्षीपासून नाशिक कवी संस्थेच्यावतीने बाळासाहेब मगर राज्यस्तरीय विनोदी कविता लेखन स्पर्धा घेतली जाईल असे सांगितले. आर्की.कृष्णभूषण महाशब्दे यांनी कॉलेजच्या आठवणी जागवल्या तर निलीमाताई पवार यांनी त्यांचे कौटुंबिक संबधांना उजाळा दिला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, के.के.वाघ इंजि. कॉलेजचे डॉ.विलास पाटीलविवेकानंद केंद्राचे राज्य समन्वयक पत्रकार विश्वास देवकर, के.के.वाघ एज्युकेशन सोसायटी चे अजिंक्य वाघ आणि डॉ.शेवलीकर, मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष सुनील ढिकले, सार्वजानिक वाचनालयाचे जयप्रकाश जातेगावकर, नातेवाईक दिलीप अहिरे, डॉ दिनेश बच्छाव यांची बाळासाहेब मगर यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. यावेळी बाळासाहेब मगर यांच्यावर प्रेम करणारे सर्व नातेवाईक, त्याच्या मूळ गाव वाखारी तालुका देवळा येथील ग्रामस्थ, नाशिक कवी आणि विवेकानंद केंद्राचे सर्व पदाधिकारी, कवी, साहित्यिक, आर्किटेक्ट, इंजिनिअर असे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

