
ओझर, (प्रतिनिधी) म. वि.प्र.समाजाचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ओझर (मिग) येथे ‘वनस्पती शास्त्र’ विभागाच्या वतीने ‘वनवैभव महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित या महोत्सवात ३१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांच्या पाककृती सादर केल्या त्याबरोबरच पुष्परचना मध्ये विविध फुलांपासून आकर्षक आणि सुंदर पुष्परचना , वेणी, गजरा,गुलदस्ते व फुलांची आणि पाकळ्यांची रांगोळी साकारली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.डी.लोखंडे होते. त्यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. या वेळी विज्ञान विभागप्रमुख आणि वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.डी.एस.बोराडे यांनी आहारातील रानभाज्यांचे महत्त्व विशद केले. तसेच पुष्परचनेपासून उपलब्ध होणाऱ्या विविध रोजगाराच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मटारू, घोळ, कपाळ फोडी, तांदूळजा, मायाळू, आघाडा, अळू, गुळवेल, नागवेली, पुदिना, जाईचा मोहोर आदी रानभाज्यांच्या पारंपरिक पाककृती सादर केल्या.फुलांच्या सजावटीत विविध फुलांचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपली कलात्मकता दाखवली.

सदर कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. मनोहर दुगजे, कला शाखाप्रमुख डॉ.शंकर आवारे, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. आशा कदम, भौतिकशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ.निलिमा भवरे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.मंगेश दुशिंग, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विनयकमल देठे, गणित विभाग प्रमुख प्रा.शरद उगले, संख्याशास्त्र विभाग प्रमुख डॉ.गणेश फड आणि विज्ञान शाखेतील डॉ.जयश्री पाटील, प्रा.हर्षला बोरस्ते, प्रा.पूजा भंडारे, प्रा. कमलाकर चव्हाण डॉ.मुकुंद ढिकले, प्रा.छाया सुतार, प्रा.स्नेहल कतवारे आणि इतर सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व कार्यालयीन सेवक उपस्थित होते. या उपक्रमासाठी परीक्षक म्हणून डॉ. निलिमा भवरे, डॉ.शंकर आवारे यांनी कामकाज केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक करत महाविद्यालयात वनवैभव सारख्याच इतरही उपक्रमावर भर द्यावा व विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवावेत असे मनोगत माननीय प्राचार्य डॉ.लोखंडे सर यांनी व्यक्त केले.रानभाज्या व डॉ. मनोहर दुगजे यांनी फुलशेतीच्या व्यावसायिक उपयोगितेवर विद्यार्थ्यांनी भर द्यावा असे मनोगत व्यक्त केले. सदर वन वैभव महोत्सवास कुमारी कोमल ढिकले, गौरी शेलार, ऋषिका खरात,कुमार सार्थक पाटील आणि इतर विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांचा मोठा प्रतिसाद लाभला. वनवैभव कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.श्रीमती.अनिता पालखेडे, प्रा.योगेश गिडगे व श्री.दिनेश पाटील -कार्यालयीन अधीक्षक,श्री.महेश कुशारे -लेखापरीक्षक, श्री.सतीश ढिकले-कार्यालयीन सेवक आणि श्री.संजय कोल्हे यांनी विशेष परिश्रम घेतले.

