
बैलपोळा’हा सण बळीराजाच्या जिवाभावाचे सोबती,म्हणजे बैलं अर्थात बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे.आज दि.१० सप्टेंबर २०२६ ला असलेल्या ‘बैलपोळा’ या सणानिमित्त साहित्यिक व कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांची कविता येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.
बैलपोळा
बैलांच्या कौतुकाचा हा दिन उगवला ॥
बळीराजाचा बैलपोळा आला रे आला ॥
राबती वर्षभर घाम घाळुनी आपला ।
भरपूर पिकता शेतकरी सुखावला ॥
बैलांच्या कष्टाने हिरवेगार शिवार ।
कृषकांच्या जीवनात आनंदाच वारं ॥
जुंपायचे नाही आज सण बैल पोळा ।
मंदिरासमोर झाले सर्वंच बैलं गोळा ॥
शेतकऱ्यांचा हा आनंदाचा सण आहे ।
रंगीत मखमली झुली पाठीवर आहे ॥
शिंगांना बेगड रंगीबेरंगी लावती ।
बैलपोळ्याला नादमधुर गीत गाती ॥
बैलांच्या गळ्यात घुंगुरमाळेचा साज ।
बैलपोळ्यातच तया आनंदाचे राज ॥
देखणे रूप बैलांचे सुंदर दिसते ॥
बघून रूप शेतकरी आनंदात न्हाते ॥
बैलांमुळे बघा होई बळीराजा सुखी ॥
निसर्गा करू नको रे तयांना तू दु:खी ॥
बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॥
बळीराजा सुखी राहो मनस्वी सदिच्छा ॥
समता गौरव पुरस्कार प्राप्त
साहित्यिक व कवी
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती :८०८७७४८६०९

