
मुळडोंगरी. ( प्रतिनिधी ),:८ सप्टेंबर रोजी सरस्वती माध्यमिक विद्यालय, मुळडोंगरी येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमशील कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. “साक्षरता हीच प्रगतीची गुरुकिल्ली” या संदेशातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व, वाचनाची आवड आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला.विद्यार्थ्यांनी “वाचूया, शिकूया, प्रगती करूया”, “प्रत्येक हातात पुस्तक, प्रत्येक मनात ज्ञान”, “शिक्षणाचा प्रकाश—समृद्धीचा विकास” अशा घोषवाक्यांच्या माध्यमातून जनजागृती केली.यावेळी विद्यार्थ्यांसाठी वाचन उपक्रम, पुस्तक परिचय, घोषवाक्य लेखन, पोस्टर निर्मिती, निबंध लेखन, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा तसेच साक्षरता प्रतिज्ञा असे विविध उपक्रम घेण्यात आले.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना साक्षरतेचा अर्थ केवळ अक्षरओळख नसून ज्ञान, विचार, विवेक आणि आत्मविश्वास प्राप्त करण्याचे प्रभावी साधन आहे, असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या परिसरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षणाचे महत्त्व पोहोचविण्याचा संकल्प केला.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण झाली. संपूर्ण विद्यालय परिसरात ज्ञान, शिक्षण आणि साक्षरतेचा प्रेरणादायी संदेश घुमला.“अक्षरज्ञानाची ज्योत पेटवूया,ज्ञानाच्या प्रकाशाने समाज उजळवूया!”अशाप्रकारे कार्यक्रमाला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

