
साकोरे ( वार्ताहर )पेडकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेचा वर्धापन दिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्यानंतर संध्याकाळी संस्थेची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत संस्थेच्या आगामी शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

बैठकीमध्ये अध्यक्षपदी प्रकाश सोनेज, उपाध्यक्षपदी हरिश्चंद्र पाटील, सचिवपदी रामकृष्ण बोरसे तर खजिनदारपदी संजय बोरसे यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित संस्थेचे पदाधिकारी, संचालकांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला अधिक व्यापक स्वरूप देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी नवनिर्वाचित पदाधिकारी प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
पेडकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेने आजवर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. आगामी काळातही संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक विकास, विद्यार्थ्यांच्या गरजा आणि सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश सोनेज व सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून त्यांच्या कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

