
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३९३ वा दिवस

आत्मानमरणिं कृत्वां प्रणवं चोत्तरारणिम् ।
ध्याननिर्मथनाभ्यासात् देवं पश्येन्निगूढवत् ।। श्वेताश्वतरोपनिषद (अध्याय १, श्लोक १४)
ज्याप्रमाणे घर्षणाने अग्नी उत्पन्न केला जाऊ शकतो, त्याचप्रमाणे ब्रह्मा ही मंथनाद्वारे प्रकट केले जाऊ शकते देह म्हणजे खालची अरणी, यज्ञातील काष्ठ असून प्रणव वा ॐ ही वरची अरणी आहे, आणि ध्यान म्हणजे जणू मंथन त्या अरणी एकमेकांवर घासणे. असे केल्याने आत्म्यामधे जो ब्रह्मज्ञानरूपी अग्नी वसत आहे तो प्रकट होऊन जाईल तपाद्वारा हे करण्याचा प्रयत्न करा. हे साधण्यासाठी तप केले पाहिजे. देह ताठ, सरळ ठेवून बसून, त्या देहरूपी वेदीवर ज्ञानेंद्रियांची मनरूपी अग्नीत आहुती द्या. ज्ञानेंद्रियांची खरी केंद्रे, म्हणजेच खरी ज्ञानेंद्रिये मेंदूत आहेत, बाहेरून दिसतात ती केवळ त्यांची उपकरणे वा यंत्रे वा साधनेच होत. म्हणून ती ज्ञानेंद्रिये जबरदस्तीने मनात प्रविष्ट करू द्या. त्यानंतर मग धारणेच्या साहाय्याने मनाला ध्यानात स्थिर करा. लाकडात अग्नी आधीपासूनच विद्यमान असतो, पण तो पाहाण्यासाठी मंथन करावे लागते. त्याचप्रमाणे परमेश्वर आपल्यातच आहे, पण त्याला अनुभवण्यासाठी ‘ॐ’ चा उच्चार करत नियमित ध्यानाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास २३ शके १९४८
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल ३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. १४ सप्टेंबर २०२६
★ हरतालिका
★ श्री गणेश चतुर्थी
★ १९३२ मराठी रंगभूमी तथा चित्रपट अभिनेते काशिनाथ घाणेकर यांचा जन्मदिन.
★ १९४९ हिंदी ही भारताची राजभाषा घोषित करण्यात आली.
★ हिंदी राजभाषा दिन.
★ जागतिक प्रथमोपचार दिन.
★ गणेश उत्सवाच्या आनंदमय, मंगलमय व चैतन्यमय हार्दिक शुभेच्छा 🕉️🕉️🔯🔯

