
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन-
इगतपुरी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे व शेतकरी नेते भास्करराव गुंजाळ यांना सामाजिक कार्याबद्दल”महाराष्ट्र भुषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुणे येथील “आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशन” या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष गणेश विटकर व सिने अभिनेत्री पुजा माळोदे यांच्या हस्ते नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
गेल्या पंचवीस वर्षांपासून गुंजाळ हे सामाजिक कार्यात अग्रेसर असुन विविध शेतकरी आंदोलनं, वृद्धांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देणे, कामगारांच्या प्रश्नांसाठी यशस्वी उपोषण करणे, समृद्धी महामार्ग कृती समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे, अतिदुर्गम असलेल्या तळोशी गावात बस सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे, अशा अनेक कार्यातून गुंजाळ यांनी आपल्या कार्याचा ठसा तालुक्यासह जिह्यात उमटवला आहे त्यांच्या याच कार्याची दखल घेत आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशन या संस्थेने त्यांना “महाराष्ट्र भुषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी भाजपा नेते डॉ शरद तळपाडे,ज्येष्ठ नेते शंकर पाटील खातळे,बाळासाहेब लंगडे,पांडुरंग जाधव, मधुकर गुंजाळ,अनिल चौधरी,निता गुंजाळ आदी उपस्थित होते

