
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे मुंबई विभागीय सरचिटणीस आणि आशिर्वाद चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईचे अध्यक्ष म्हणूनही सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या उमेश येवले यांच्या निवासस्थानी भक्तिभावाने विराजमान झालेल्या गणरायाच्या सान्निध्यात संपूर्ण परिवाराचा आनंद आणि उत्साह खुलला. गणरायाच्या चरणी श्रद्धेने नतमस्तक होत परिवाराने सुख, समाधान आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. कौटुंबिक जिव्हाळा आणि भक्तिभावाने भारलेला हा मंगलमय क्षण छायाचित्रातून मनाला प्रसन्न करणारा आहे.

