
ढेकू ( प्रतिनिधी) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे आज अभियंता दिन निमित्त विद्युत सुरक्षा सप्ताह अंतर्गत जनजागृती अभियान राबविण्यात आले कार्यक्रम प्रसंगी महावितरण विभाग अंतर्गत मनमाड विभागातील जातेगाव उपकेंद्राचे अभियंता माननीय श्री भामरे साहेब यांचा अभियंता दिनानिमित्त शाळेमार्फत सत्कार करण्यात आला व त्यांच्या समवेत घाटमाथ्यावरील श्री जितेंद्र काकळीज श्री गोरख राऊत श्री रोहन फणसे श्री अक्षय निकम श्री जयेश पाटील श्री किशोर पवार श्री किशोर व्यापारी श्रीमती चव्हाण मॅडम आदी सर्व वायरमन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते

कार्यक्रमाची सुरुवात अभियानाबद्दल प्रास्ताविक माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री जे एम थोरात यांनी केले तर सर्व मान्यवरांचे परिचय शाळेचे अधीक्षक श्री नितानकर नितीन एकनाथ यांनी केले. सर्व मान्यवरांचा स्वागत व सत्कार श्री जे एम थोरात , श्री डी आर सूर्यवंशी श्री नितानकर नितीन एकनाथ यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री भामरे साहेब यांनी मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांपर्यंत शासनामार्फत स्मार्ट सोलर योजना व त्या योजनेचे प्रमुख फायदे शासनामार्फत मिळणारे अनुदान व त्यासाठी असणारे अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे शासनाकडून मिळणारे अनुदान याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली
सर्व समाजातील सर्व घटकांनी या महाराष्ट्र शासनाच्या छता वरील सोलर योजनेचा लाभ घ्यावा व आपले विज बिल शून्य करावे असे आवाहन केले सदर आव्हाना सोबत सौरऊर्जेबाबत असणारे माहितीचे पत्रक विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे शाळेचे शिक्षक श्री देवरे भाऊसाहेब यांनी शाळेकडून आभार व्यक्त केले

