
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन
ऐन गणेशोत्सवाचे कालखंडात आहुर्ली सह परिसरात वीजेचा लंपडाव सुरु आहे. संध्याकाळी ६ नंतर अकस्मात वीज गायब होते, तर रात्री उशीरा वीज अकस्मात येते.
दरम्यान वीज वितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे गणेश भक्तामध्ये संताप व्यक्त होतो आहे.
हेच का हिंदुत्ववादी विचाराचें सरकार ? हेच का या सरकारचे अच्छे दिन ? हिंदुच्यांच सणात वीज गुल का व कशी होते ? असे सवाल नागरिक करत आहे.
गणेशोत्सव हा सण महाराष्ट्राची एक सांस्कृतीक ओळख आहे. महाराष्ट्रातील गाव न गाव, व गावातील गल्लीच्या हर एक कोपर्यात गणपती बाप्पास विराजमान केले जाते.या शिवाय घराघरात ही गणरायाचे आगमन होते.हा दहा बारा दिवसाचा काळ अत्यंत आनंदात साजरा होतो.
मात्र वीज वितरण चे ढिसाळ नियोजन व अक्षम्य दुर्लक्ष यामुळे आहुर्ली परिसर ऐन गणेशोत्सवाचे कालखंडात अंधारात बुडाला आहे.

