
सेलू 🙁 प्रतिनिधी ) बोर्डीकर्स पोदार लर्न स्कूल, सेलू येथील विद्यार्थी पर्व काला याने जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. या उल्लेखनीय यशामुळे त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पर्व काला याने स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जिद्द, चिकाटी आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले. नियमित सराव, मेहनत आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यांमुळे त्याला हे यश संपादन करता आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका रितू श्रीवास्तव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बॅडमिंटन प्रशिक्षक सिद्धेश्वर भैरट सर यांच्या प्रशिक्षणामुळे पर्व काला याला ही उल्लेखनीय कामगिरी करता आली.
या यशाबद्दल शाळेच्या अध्यक्ष भावनाताई बोर्डीकर (मुंगसे) यांनी पर्व काला याचे अभिनंदन करून विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्याध्यापिका, प्रशिक्षक आणि शिक्षकवृंद यांनी त्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
पर्व काला याच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विभागीय स्तरावरही तो उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा गौरव वाढवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

