
सिन्नर ( प्रतिनिधी ) आदिवासींचे आधारस्तंभ काळूराम काका धोदडे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले
महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने काळूराम काका धोदडे यांना सिन्नर येथे अभिवादन .
या कार्यक्रमाची सुरुवात निसर्गवासी काळूराम काका धोदडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी काळूराम काका धोदडे यांच्या जीवन कार्याचे परिचय करून दिला
आदिवासी समाजाचे एक आधारस्तंभ होते, ज्यांनी आपल्या कार्याद्वारे आदिवासींच्या हक्कांचे आणि स्वाभिमानाचे संरक्षण केले.त्यांनी आदिवासी समाजातील बांधवांना सोबत घेऊन त्यांनी १९६३ मध्ये भूमिसेनेची स्थापना करून आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी चळवळ सुरू केली. आदिवासींना त्रास देणाऱ्या प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी लढा दिला. आदिवासींचे हक्क: जल, जंगल आणि जमिनीवर आदिवासींच्या अधिकारांसाठी त्यांनी विविध आंदोलने केली. आदिवासी एकता परिषदेचे अनेक राज्यांमध्ये आदिवासी संस्कृती संमेलन होत आहेत.गेल्या अनेक दशकांहून अधिक काळ आदिवासींसाठी ते चळवळीत सक्रिय होते आणि त्यांचे १० ऑक्टोबर २०२४ मध्ये निधन झाले. असे आदिवासींचे आधारस्तंभ काळूराम काका धोदडे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश धोंगडे यांनी केले व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले तर आभार कुमारीअभिशा वायचळे हिनी मानले
याप्रसंगी कुमारी अभिशा वायचळे, कुमारी निकिता मुठे महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे, संदिप मुठे आकाश धोंगडे, सचिन लुटे सावळीराम दिवे किसन महात्मे सुमित हजारे बाळनाथ कारले प्रभाकर गाडेकर रेशीम शेख बाबा रोहित मुठे किरण मुठे श्याम डांगे प्रकाश गुंजाळ कार्तिक मुठे आदि.उपस्थित होते

