
ग्लोबल वारी.. जगात भारी ……. वारकरी सांप्रदायाचा साता समुद्रा पार अटकेपार झेंडा रोवत संतपरंपरेचा खरा मार्ग दाखवत राम कृष्ण हरी चा जयजयकार करत महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीचे संत परंपरेचे दर्शन घडविणारी 11 देशांमध्ये ज्ञानोबा माऊलींच्या गजरात थेट लंडन हून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पादुका घेऊन ग्लोबल वरी माननीय अनिल जी खेडकर सर यांच्या आशीर्वादाने मोठ्या दिमाखात भारतात दाखल झाली .

पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना दरम्यान या ऐतिहासिक सोहळ्याचे सारे मावळ वाशी साक्षीदार होऊन सोमाटणे फाटा मावळ तालुक्यामध्ये टाळ मृदंगाच्या निनादात विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा राम कृष्ण हरी जय गजरात भव्य असे स्वागत करण्यात आले.परदेशामध्ये सुरू असलेला हा जागर पाहता खरोखर आपली भारतीय संस्कृती वारकरी सांप्रदाय किती महान आहे याची जाणीव झाली अभिमानाने प्रत्येक भारतीय जीवन आज उंचावली अनिल जी खेडकर यांच्या संकल्पनेतील ही परदेश वारी कौतुकास्पद ठरली

मावळ तालुका वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष संतोष शेलार यांनी उत्तम नियोजन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
दरम्यान मावळचे कवी भूषण भारत गौरव पुरस्कार प्राप्त विठ्ठल दळवी सर यांनी संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारून उपस्थितांची मने जिंकली संत विचाराशिवाय पर्याय नाही विश्वाला इतिहास वाचल्याशिवाय अभ्यासल्याशिवाय इतिहास घडणार नाही असा प्रेरणादायी इतिहास शालेय शिक्षण अभ्यासक्रमात येण्यासाठी व गुरुकुल सारखी विद्यालय स्थापन होण्यासाठी हो प्रयत्न करीत असणारे दळवी सर यांच्या पवित्र कार्यास मनापासून शुभेच्छा देऊया
.यावेळी भंडारा डोंगराचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद किसान मंचाचे शंकरराव शेलार गजानन शेलार जगन्नाथ भेगडे शिवाजीराव पवार उद्धव शेलार मुकुंद नाना राऊत दिलीप ढोरे संजय मामा भेगडे नवनाथ शेलार रामहरी शेलार बापू लिमन यांच्या नेतृत्वाखाली सेवा संपन्न झाली. राम कृष्ण हरी…

