

नाशिक जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन-
पाऊस नाही, पाऊस नाही म्हणता म्हणता यंदा जुलै महिन्यातच सलामीलाच मुसळधार व विक्रमी पावसाने हजेरी लावली आहे. अतिवृष्टी व संभाव्य ढगफुटीचे पाश्वर्भुमिवर जनजीवन विस्कळीत झाले आहे.दुसरीकडे विक्रमी अतिवृष्टीने बळीराजा मात्र सुखावला असुन भर पावसात भात पिक लावणीचे कामाने प्रचंड वेग घेतला आहे.
आहुर्ली परिसरात एका लागत एक दगडी वैतारणा हे मुंबई राजधानी शहरासाठी पाणी साठा राखीव असलेले धरण आहे तर पश्चिम वाहिनी गोदावरी खोरेतंर्गतचे मुकणे हे धरण आहे. अतिवृष्टीमुळे धो धो भरुन वहायला सुरुवात झाली आहे.
इगतपुरी तालुका हा अति पावसाचा म्हणुन ओळखला जात असुन, डोंगर, दरी, धबधबे व अतीव निसर्गाने नटलेला पर्यटनासाठी पर्यटकानां नेहमीच भुरळ पाडणारा म्हणुन ओळखला जातो.
यंदाही परिसरातील वैतारणा, पहिणे, हरीहरीगड आदीसह सुप्रसिध्द ठिकाणासह छोटया मोठया स्थळावर पर्यटक गर्दी करत असुन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत आहे.

