
सिन्नर (प्रतिनिधी)१३ जुलै २०२६ शिवा काशीद यांच्या ३६६ व्या बलिदान दिनानिमीत्त महामित्र परिवार , आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड व संविधान प्रेमी यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले

या कार्यक्रमाची सुरुवात शिवा काशीद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी शिवा काशिद यांच्या कार्याची माहिती देताना म्हणाले की
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पन्हाळगडाला सिद्धी जौहर यांनी वेडा घातला त्यावेळी शिवा काशीद यांनी आपल्या जीवाची परवा न करता त्यांनी शिवाजी महाराजांना सुखरूप बाहेर पडण्यासाठी त्यांनी जो गनिमी काव्याने
महाराजांची सुटका करण्यासाठी त्यांनी स्वतः महाराजांचा वेश धारण करून स्वतःचे बलिदान दिले होते।पन्हाळगडावर सिद्दी जौहरने दिलेल्या ४ महिन्यांच्या प्रदीर्घ वेढ्यातून बाहेर पडणे महाराजांसाठी अशक्य झाले होते। अशा अत्यंत बिकट प्रसंगी शिवा काशीद यांनी पुढाकार घेत महाराजांची वेशभूषा केली आणि पालखीत बसून मुख्य दरवाजाने बाहेर पडले। शत्रूचे सैन्य त्यांनाच शिवाजी महाराज समजून त्यांच्या मागे धावले। या युक्तीमुळे सिद्दी जौहरचे सैन्य काही काळ भरकटले आणि त्याच संधीचा फायदा घेऊन महाराज अवघ्या काही मावळ्यांसह सुरक्षितपणे विशाळगडाकडे मार्गस्थ झाले।जेव्हा सिद्दी जौहरला कळालं की शिवाजी महाराज सुखरूप बाहेर पडलेले आहे जो शिवाजी महाराज म्हणून आला आहे तो शिवाजी नसून शिवा काशीद असल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी संतापाने शिवा काशीद यांची निर्घृण हत्या केली। स्वराज्यासाठी व आपल्या राजासाठी प्राणांची आहुती देणारे शिवा काशीद यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अमर झाले। अशा महान योद्धास विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तविक विजय मुठे यांनी केले तर आभार प्रा. प्रभाकर चतुर सर यांनी मानले
यावेळी उपस्थित महामित्र दत्ता वायचळे प्रा. प्रभाकर चतुर सर, आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, अशोक वरंदळ, संजय गोळेसर, रमेश सालमुठे,संदिप मुठे,राहुल पवार, पोपट काळे ,शरद जाधव भुषण मोरे, रोहित मुठे, शाम डांगे आदि उपस्थित होते.

