
सिन्नर (प्रतिनिधी)सामाजिक समतेचा लढाऊ योद्धा दिवंगत निळू फुले यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त महामित्र परिवार,संविधान प्रेमी व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन
या कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत निळूभाऊ फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी दिवंगत निळूभाऊ फुले यांच्या सामाजिक व मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायकाच्या भूमिका अजरामर करणारे निळू फुले हे केवळ एक महान अभिनेते नव्हते; तर ते सामाजिक परिवर्तनाची जाणीव असलेले सत्यशोधकी विचारांचे खरे शिलेदार होते.पडद्यावर त्यांनी अनेकदा खलनायक साकारला, पण वास्तव जीवनात ते वंचित, शोषित आणि बहुजन समाजाच्या न्यायासाठी झटणारे खरे नायक ठरले. अभिनयाच्या चौकटीत न अडकता त्यांनी महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांना कृतीतून साथ दिली. पुरोगामी चळवळींना त्यांनी कायम वैचारिक व नैतिक बळ दिले.आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक न्याय, समता आणि सत्यशोधक विचारांच्या या ध्येयवेड्या कलावंतास विनम्र अभिवादन तसेच
प्रा प्रभाकर चतुर सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी निळू भाऊ फुले यांच्या जीवनकार्याची माहिती देताना म्हणाले की निळू फुले यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. अभिनयक्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवलेल्या निळू फुले यांचा त्यांनी ‘सामना ‘ ‘,सिंहासन’, ‘भुजंग’, ‘पुढचं पाऊल’ ‘ पिंजरा’ ‘ एक होता विदूषक ‘यांसारख्या चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका अजरामर झाल्या आहेत. तर रंगभूमीवरही त्यांची अनेक नाटकं गाजली आहेत. अनेक मराठी नाटकांना प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. असे म्हणाले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मुठे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. प्रभाकर चतुर सरांनी केले व आभार भूषण मोरे यांनी मानले
यावेळी उपस्थित महामित्र दत्ता वायचळे, प्रा. प्रभाकर चतुर,आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, संदीप मुठे भूषण मोरे ,योगेश मोरे, लखन चव्हाण, रोहित मुठे आकाश धोंगडे, श्याम कुंदे, योगेश सोनवणे आदि. उपस्थित होते.

