
सिन्नर (प्रतिनिधी)जागतिक आदिवासी नेता नेल्सन मंडेला यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात नेल्सन मंडेला यांच्या प्रतिमेला पुष्पहार
अर्पण करून करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी नेल्सन मंडेला यांच्या कार्याची माहिती देताना म्हणाले की
नेल्सन मंडेला यांना आफ्रिकेतील लोकशाहीचे जनक मानले जाते.दक्षिण आफ्रिकेत गोरा काळा रंगावरून भेदभाव केला जात असे.त्या विरूद्ध आवाज उठवून भेदभाव नाहीसा होण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती केली व संघर्ष केला. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून ते दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती बनले.नेल्सन मंडेला यांनी महात्मा गांधी यांना प्रेरणास्थान मानून त्यांनी सत्य अहिंसेची जोपासना केली. लोक त्यांना राष्ट्रपिता म्हणत असत.नोव्हेंबर २००९ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने रंगभेद विरोधी त्यांनी केलेल्या संघर्षाची दखल घेतली व त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस १८ जुलै हा “मंडेला दिवस” म्हणून घोषित केला.त्यांना त्यांच्या कामगिरी बद्दल जगातील अनेक देशांनी संस्थांनी सन्मान व पुरस्कार दिले. अशा महान नेता नेल्सन मंडेला यांना विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अभिशा वायचळे हिने केले व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले तर आभार श्रवण क्षत्रिय यांनी मानले
यावेळी अभिवादन करण्यासाठी उपस्थित महामित्र दत्ता वायचळे आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे श्रवण क्षत्रिय संदीप मुठे, रोहित मुठे आकाश धोंगडे, प्रकाश गुंजाळ, शरद जाधव, शाम डांगे, बाळासाहेब जाधव, माऊली चांदणे कु.अभिशा वायचळे,सहस्या वायचळे उपस्थित होते

