
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३३७ वा दिवस

भविष्यातील भारताच्या निर्मितीतील पहिले पाऊल किंवा भारतरुपी प्राचीन प्रस्तरात खोदावयाची पहिली पायरी म्हणजे धर्माचे ऐक्य होय. आपण सर्वांनी हे जाणून घेतले पाहिजे की आपण द्वैती, विशिष्टाद्वैती, अद्वैती, शैव, वैष्णव व पाशुपत कोणीही वा कोणत्याही संप्रदायाचे अनुयायी असलो तरी आपली सर्व हिंदूंची काही समान अशी धार्मिक तत्वे आहेत. आपल्या व समाजाच्या कल्याणासाठी आपण सर्व क्षुद्र कलह व भेद टाकून देण्याची आता वेळ आलेली आहे. निश्चित जाणून असा की हे कलह अगदी चुकीचे आहेत; आपल्या धर्मग्रंथांनी त्यांचा निषेध केलेला आहे. आपल्या पूर्वजांनी त्यांचा धिक्कार केलेला आहे. ज्या थोर महात्म्यांचा आपण वारसा सांगतो व ज्यांचे रक्त आपल्या धमन्यांतून वाहते ते महात्मे क्षुद्र मतभेदांवरून भांडत बसणाऱ्या आपल्या वंशजांकडे तिरस्काराने पाहत असतील. जेव्हा रक्त शुद्ध व शक्तिशाली असते तेव्हा कोणतेही रोगजंतू शरीरात जगू शकत नाही. आध्यात्मिकता हेच आपल्याला जीवन देणारे रक्त आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर आषाढ २९ शके १९४८
★ आषाढ शुध्द /शुक्ल ७
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. २० जुलै २०२६
★ १९०८ बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या पुढाकाराने “बँक ऑफ बडोदाची स्थापना.
★ १९२९ हिंदी चित्रपट अभिनेते राजेंद्र कुमार यांचा जन्मदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

