
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३३६ वा दिवस
ज्ञानयोग्याचे या जीवनातील अंतिम ध्येय जीवन्मुक्त होणे हेच असते. जो या जगात अनासक्त होऊन राहू शकतो तोच जीवन्मुक्त होय. तो पाण्यात वाढणाऱ्या कमलपन्नासारखा असतो; ही पाने पाण्यात असूनही पाण्याने भिजत नाहीत; तद्वत् हा माणूस जगात राहूनही जगाने लिप्त होत नाही. हा माणूस केवळ सर्व मानवांहूनच नव्हे, तर सर्व प्राण्यांहूनही श्रेष्ठ असतो, कारण त्याला त्या निरपेक्ष सत्तेशी आपल्या ऐक्याचा साक्षात्कार झालेला असतो, त्याला 'मी ईश्वराशी एकरूप आहे' ही अनुभूती झालेली असते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर आषाढ २८ शके १९४८
★ आषाढ शुध्द /शुक्ल ६
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. १९ जुलै २०२६
★ १८२७ क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्मदिन.
★ १९३८ भारतातील सुप्रसिध्द खगोलशास्त्र डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्मदिन.
★ १९६९ पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता.

