
दातली (प्रतिनिधी )माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर दातली विद्यालयात दातली गावचे सुपुत्र मा डाॅ.श्री भरतजी गारे साहेब यांनी स्व.श्री हरी दादा गारे व गं.भा.पुजाबाई हरी गारे यांच्या स्मरणार्थ ठेवलेले 2 लाख रू.ठेवीच्या व्याजापोटी येणा-या रकमेतून 22 हजार रुपये एवढ्या रकमेतून आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप कार्यक्रम शनिवार दिनांक 18/07/2026 रोजी घेण्यात आला या प्रसंगी 40 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मा.श्री.डाॅ.गारे यांच्या सहकार्याने वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास संगमनेर स.सा.कारखाण्याचे संचालक मा.श्री.बंडूनाना भाबडत मा.डॉ श्री भरतजी गारे साहेब क्रा.व.ना.नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे शिक्षण अधिकारी मा.श्री.ई के.भाबड सर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डाॅ.श्री.पी.आर भाबड सर, श्री लहानू भाबड उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, उपाध्यक्ष श्री मनोहर कुटेश्री अंबादास आव्हाड, मा प्राचार्य श्री ज्ञानेश्वर चांदोरे सर , पुंजा केदार विद्यालयाचे प्राचार्य श्री पठाण सर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.नवनाथ सानप सर यांनी केले या प्रसंगी ज्युनिअर कॉलेज चे सर्व प्राध्यापक माध्यमिक चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

