
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३३९ वा दिवस

आपली वैभवशाली असलेली प्राचीन संस्कृत भाषा ही सर्वसामान्य जनतेसाठी कठीण आहे. आणि जोवर आपले सर्व राष्ट्र संस्कृतज्ञ होऊ शकत नाही तोवर आपल्या समोरील अडचणी दूर होणार नाहीत. समस्त देशवासीयांना संस्कृत भाषेचे ज्ञान लाभले की भारताला प्रतिष्ठा प्राप्त होईल. एकदा तुम्हाला हे ज्ञान लाभले की तुमच्या विरुद्ध कोणीही काहीही बोलण्याची हिंमत करणार नाही हेच एकमेव रहस्य आहे, ते समजून घ्या. अखिल विश्वाने स्वतःच स्वतःला संमोहित करून ठेवले आहे. दृढ निश्चय हे सामर्थ्य आहे. दृढ निश्चयाचा मनुष्य स्वतःभोवती जणू काही तेजाचे वलय निर्माण करीत असतो. त्याच्या स्वतःच्या मनाची जी अवस्था असते तीच अवस्था तो इतरांच्या ठायी देखील उत्पन्न करीत असतो अशा दृढ निश्चयाची माणसे वेळोवेळी अविर्भूत होत असतातच. जेव्हा अशी एखादी प्रभावी व्यक्ती निर्माण होते तेव्हाच तिच्या व्यक्तिमत्वामुळे तिचे विचार आपल्यापैकी अनेकांच्या मनात उत्पन्न होतात व अशा प्रकारे आपण सारे सामर्थ्य संपन्न होतो.
*स्वामी विवेकानंद...*

●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर आषाढ ३१ शके १९४८
★ आषाढ शुध्द /शुक्ल ९
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. २२ जुलै २०२६
★ १९२३ सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट पार्श्वगायक, विविध भाषांमधून दहा हजारांहून अधिक गीत गायलेले गायक मुकेश चंद माथूर यांचा जन्मदिन.
★ १९२५ थोर विचारवंत, लेखक, पत्रकार (दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे २७ वर्षे संपादक) गोविंद तळवलकर यांचा जन्मदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
*महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, गणतंत्र न्यूज, नांदगाव*


