
नांदगाव (प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक संस्थेचे, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे दिनांक 20 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12: 30 या वेळेत दीक्षारंभ कार्यक्रम (Induction Program) चे आयोजन करण्यात आले होते.

मा. प्राचार्य प्रो. डॉ. एन.यु.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांकरिता
महाविद्यालयातील विविध विभागांतर्गत चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती व ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली.

महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रो. डॉ. एस. ए. मराठे यांनी दीक्षारंभ कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत मराठा विद्या प्रसारक संस्थेविषयी व महाविद्यालया विषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
भूगोल विभागप्रमुख तथा सिनेट सदस्य प्रो. डॉ. सी.बी.निगळे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि अभ्यासक्रम संरचना, आकृतीबंध, क्रेडिट पद्धती ऑनलाईन लर्निंग कोर्सेस याविषयी तसेच अकॅडमीक बँक क्रेडिट याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी डॉ पी.टी. निकम यांनी महाविद्यालयातील परीक्षा पद्धती व मूल्यमापन संबंधित सविस्तर मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. बी.एम.अहिरे यांनी एन.एस.एस. अंतर्गत विविध उपक्रमांची तसेच हिवाळी श्रमसंस्कार शिबिराविषयी मार्गदर्शन केले.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. डी.वाय.तुंगार यांनी या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात नोकरी संधी याविषयी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्र प्रमुख डॉ. आर. व्ही. वाघ यांनी महाविद्यालयात चालणाऱ्या स्पर्धा परीक्षा केंद्राची व विविध स्पर्धा परीक्षा विषयीची माहिती दिली.
करिअर कट्टा समन्वयक प्रा. आर.टी.बिन्नर यांनी करिअर कट्टा व महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उद्योजक व आयएएस आपल्या भेटीला याविषयी सविस्तर माहिती दिली.
महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. एस.एस.शेंडगे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील कमवा शिका योजना तसेच निर्भय कन्या अभियान व अँटी रॅगिंग सेल याविषयी माहिती दिली.
महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा एम.एल.गळदगे यांनी महाविद्यालयातील जिमखाना तसेच महाविद्यालयात संपूर्ण वर्षभरात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन कशा प्रकारे केले जाते व यात सर्व विद्यार्थी सहभागी होऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती दिली.
आय क्यू ए सी समन्वयक प्रा.एम.बी.आटोळे यांनी महाविद्यालयातील ग्रंथालया विषयीची माहिती व पुस्तकांची देवाणघेवाण कशी चालते याविषयी तसेच IQAC व ARC तसेच अविष्कार स्पर्धा याविषयी माहिती दिली.
अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कार्यपद्धती इंडक्शन प्रोग्राम तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, स्पर्धा परीक्षा नियमित अध्ययन पद्धती याबरोबरच महाविद्यालयातील विविध घटकांचा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ए . बी. जाधव वाणिज्य विभागप्रमुख तसेच दीक्षारंभ कार्यक्रम समन्वयक यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विभागातील विभाग प्रमुख, प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रो. डॉ.सी. बी निगळे यांनी केले.

