
सिन्नर (प्रतिनिधी)
शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी तसेच नीट, टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणातील दोषी असणाऱ्या गुन्हेगारांना कडक शासन करावे,तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणात नैतिक जबाबदारी म्हणून त्वरित राजीनामा द्यावा,सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या शांततेच्या मार्गाने चाललेले दिल्ली येथील सीजेपीच्या वतीने जंतर मंतर मैदानात सुरू असलेले आंदोलन चिरडून टाकण्यासाठी वांगचुक यांना उपोषण स्थळापासून पोलिसांनी उचलून नेले व नियोजित 20 जुलैच्या मोर्चाला परवानगी नाकारली याचा निषेध म्हणून सिन्नरकरांनी नायब तहसीलदार सागर मुंदडा यांना निवेदन दिले. यावेळी सरकारच्या दडपशाही तसेच शिक्षण क्षेत्रातील बाजारीकरण विरोधात कॉम्रेड.हरिभाऊ तांबे,महामित्र दत्ता वायचळे, डॉ.श्यामसुंदर झळके,अरुण घोडेराव, डॉ.रावसाहेब जाधव,विजय मुठाळ आदींनी आपल्या मनोगतात सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध करून,सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.यावेळी राजेंद्र जाधव,सागर देशमुख,रुपेश मुठे,नितीन कटारे,कपिल कोठूरकर,अमोलराजे देशमुख,चेतन ढेंगळे,सोनू कटारनवरे, मिलिंद साळवे,नीलेश दिघे,राहुल इनामदार,प्रभाकर उघडे आदी उपस्थित होते.

