
नांदगाव:—(प्रतिनिधी) मविप्र समाज संस्थेच् आदर्श प्राथमिक शाळा , नांदगाव शाळेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त तसेच ‘हरित कुंभ’ आणि ‘हरित मान्सून’ अंतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ हा पर्यावरणपूरक उपक्रम अत्यंत उत्साहात आणि पर्यावरण स्नेही वातावरणात राबविण्यात आला.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे आणि निसर्गाचे रक्षण करणे हा होता. याप्रसंगी विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाराम कारभारी गवादे , व सदस्य – राजेश पाटील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रा नांदगावचे प्राचार्य हरिश्चंद्र ठाकरे, मुख्याध्यापक – साळुंके ऐ.पी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक साळुंके सर म्हणाले की,

“वृक्षारोपण हे केवळ एक दिवसाचे काम नसून, ती काळजी गरज आहे. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, पर्यावरणाचे समतोल राखतात आणि मानवी जीवनाचा आधार आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेल्या झाडाचे मनापासून जतन केले पाहिजे.”
कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली व परिसर हिरवागार करण्याचा संकल्प केला.

