
सिन्नर (प्रतिनिधी)
येथील निसर्गोपचार व ॲक्युपंक्चर तज्ञ तसेच सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष ,सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद रेवजी सानप यांना नुकताच ” महा ॲक्युपंचरत्न 2026 ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने दिनांक १९ जुलै २०२६ रोजी छत्रपती संभाजी नगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथील आयोजित शानदार कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट रुग्णसेवा,समाजसेवा याची दखल घेत डॉ.आनंद सानप यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी सिने कलावंत सुयोग गोरे त्यांचे पिताश्री प्रसिद्ध ॲक्युपंक्चर तज्ञ डॉ.राजेंद्र गोरे,आयुषचे पदाधिकारी बाबुराव कानडे,डॉ.अभिजित कवठकर,विजयनवल पाटील डॉ.नितीनराजे पाटील, ॲड.दत्तात्रय जाधव,नागेश सोनने,दिशा चव्हाण,तुषार वाघुळदे,प्रशांत सावंत आदी उपस्थित होते.पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.सानप यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

