
मविप्र संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त तसेच ‘हरित कुंभ’ आणि ‘हरित मान्सून’ अंतर्गत वृक्षारोपण करताना विजय काकळीज, सुनील बोरसे, अरविंद बोरसे, संजय कदम, हरिश्चंद्र ठाकरे, ज्योती काळे, अविनाश शेवाळे.
नांदगाव:—(प्रतिनिधी) मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त तसेच ‘हरित कुंभ’ आणि ‘हरित मान्सून’ अंतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ हा पर्यावरणपूरक उपक्रम अत्यंत उत्साहात आणि पर्यावरण स्नेही वातावरणात राबविण्यात आला.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे आणि निसर्गाचे रक्षण करणे हा होता. याप्रसंगी विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय काकळीज , औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील बोरसे, अरविंद बोरसे सर, संजय कदम , प्राचार्य हरिश्चंद्र ठाकरे, मुख्याध्यापिका ज्योती काळे पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका ज्योती काळे म्हणाल्या की,
“वृक्षारोपण हे केवळ एक दिवसाचे काम नसून, ती काळजी गरज आहे. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, पर्यावरणाचे समतोल राखतात आणि मानवी जीवनाचा आधार आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेल्या झाडाचे मनापासून जतन केले पाहिजे.”
या उपक्रमाचे नियोजन हरित सेना प्रमुख गजेंद्र माताडे यांनी केले.
कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली व परिसर हिरवागार करण्याचा संकल्प केला.

