
आसरखेडे (दि. २२ जुलै):
स्थानिक जनता विद्यालय आसरखेडे येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच याच दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयात विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी शालेय समितीचे अध्यक्ष श्री. वैभव निमसे, शालेय समितीचे सन्माननीय सदस्य श्री. शिवाजीबाबा दिवटे, श्री. नामदेवराव दिवटे, श्री. निवृत्ती पाटील पवार, श्री. नंदू पाटील जाधव तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी संचालक श्री. गोरख ढगे आणि इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सी. आर. कापडणीस मॅडम यांनी केले.
त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते माजी उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
हा कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्त वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी विशेष परिश्रम घेतले.

