
भालूर ( प्रतिनिधी )म.वि.प्र.संचालित जनता विद्यालय भालूर या ठिकाणी आज दिनांक 22/7/2026रोजी विद्यालयामध्ये अजित दादा पवार जयंती चे आयोजन करण्यात आले.
तसेच यावेळी कर्मवीर काकासाहेब वाघ आणि माधवराव बोरस्ते या गुरु शिष्य स्मृतिदिन ही साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरू नाना आहेर
हे होते.

तसेच यावेळी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सुखदेव बाबा लहीरे ,चांगदेव उगले , सावलिराममडके, सुभाष निकम उपस्थित होते
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय वैद्य सर यांनी अजित दादा पवार यांचा कार्याचा उजाळा दिला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

