
नांदगाव (प्रतिनिधी): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (न्यू इंग्लिश स्कूल आवार) नांदगाव येथे आज स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच गुरुशिष्य कर्मवीर काकासाहेब वाघ आणि सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार, कर्मवीर काकासाहेब वाघ आणि सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील कार्याचा गौरवपूर्ण स्मरण केला. यावेळी स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. तसेच कमिटी सदस्य अरविंद बोरसे, संजय कदम, अभय देशमुख तसेच इतर सदस्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शाखेचे प्राचार्य एच. बी. ठाकरे , गटनिदेशक एस जे ठाकरे तसेच संस्थेचे सर्व शिक्षक, सेवकवृंद आणि कर्मचारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प करत समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

