
नाशिक:( प्रतिनिधी)-मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता विद्यालय रामेश्वर या विद्यालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे देवळा तालुका संचालक माननीय श्री विजय नाना पगार व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री माणिक रघुनाथ पगार व सदस्यांच्या हस्ते शालेय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री ढेपले बी के सर, जेष्ठ शिक्षक श्री पगार जी टी सर, श्री सावंत बी एस सर व शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंद उपस्थित होते.

