
वासोळ-:( प्रतिनिधी )येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयात २२ जुलै २०२६ रोजी कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते गुरु शिष्य यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी शालेय समिती सदस्य श्री.गोरख भामरे,श्री.भारत आहिरे श्री.बबलु पवार कार्यक्रमासाठी उपस्थित होते.मा.मुख्याध्यापक श्री.केदार एस.एस.यांच्या मार्गदर्शनाखाली व सांस्कृतिक समिती प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सुरुवातीला अध्यक्षांच्या हस्ते कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.विद्यालयातील उपशिक्षक श्री.सावंत सर यांनी कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या जीवन कार्याविषयी माहीती सांगितली. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयातील
उपशिक्षक श्री.निकम एस.के.श्रीम.गुजर एस.एन.श्री.सावंत व्ही.बी.श्री.आहेर एस.सी.श्री.पवार आर.एस.श्री.ठाकरे एस.डी.श्री.चौधरी आर.एस.श्रीम.मोरे जे.आर.या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व सेवकवृंद व शिक्षकेत्त कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.आहेर एस.सी.यांनी केले…

