
पळाशी ( प्रतिनिधी)
आज दि.22 जुलै रोजी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल पळाशी विद्यालयात महाराष्ट्राचे माजी उमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली. स्व. अजितदादा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सांस्कृतिक प्रमुख श्री.गोकुळ शिंदे सर यांनी प्रास्ताविक केले ,विद्यालयाचे प्राचार्य श्री. अरुण पवार सर यांनी आपल्या मनोगतातून स्व. अजितदादांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.तसेच सदर कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य. अरुण पवार सर, शैलेश पवार सर, गोकुळ शिंदे सर,विशाल देवरे सर, कैलास राठोड सर, विजय आव्हाड सर, संदिप वाघापुरे सर, अमोल देवरे सर, संदिप वाघ सर, प्रभाकर घुगे, अशोक शेवाळे, मनोज शेवाळे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

