
नांदगाव (प्रतिनिधी ) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक ‘कर्मवीर काकासाहेब वाघ व कै.माधवराव बोरस्ते’ या गुरु शिष्याचा स्मृती दिन व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली.

सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.यु.पाटील, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद पाटील, तालुका क्रीडा अधिकारी अरविंद चौधरी,स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य अरविंद पाटील, जनार्दन पवार यांनी गुरु- शिष्य स्मृतिदिन प्रित्यर्थ कर्मवीर काकासाहेब वाघ,कै.माधवराव बोरस्ते व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.

सदर प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.एम. राठोड,त्रिभुवन सर, संदीप आहेर, महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिवंगतांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
या निमित्ताने म.वि.प्र.संचालक अमित बोरसे-पाटील यांच्या प्रेरणेने महाविद्यालयाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या’ वतीने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले
सदर प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना+2 स्तरचे कार्यक्रम अधिकारी बी.के.पवार यांनी वर्गात विद्यार्थ्यांना कर्मवीर काकासाहेब वाघ, कै.माधवराव बोरस्ते व स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जीवन कार्याची सविस्तर माहिती दिली.

वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, वरीष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.एम.अहिरे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.पवार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.सी.पैठणकर व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

