
नांदगाव. ( प्रतिनिधी)-न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे गुरु शिष्यांच्या स्मृतिदिन संपन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. व्ही.वाय काकळीज सर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.जे.आर काळे, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री.दुकळे ए.व्ही, श्री.देशमुख.व्ही एस, श्री.पगार ए एस, श्री.भिलोरे डी.एम., श्रीमती.आहिरे मॅडम, केदारे मॅडम,तासकर मॅडम, जाधव मॅडम, अहिरे मॅडम करून उपस्थित होते.सर्व प्रथम प्रतिमा पूजन झाले.
याप्रसंगी बोलताना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. जे.आर काळे यांनी कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याविषयी विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. शिक्षण हा स्वातंत्र्याचा पाया आहे.या विचारांनी तळागाळातील सर्वांपर्यंत शिक्षण पोहचले पाहिजे यासाठी त्यांनी तळमळीने कार्य केले .असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.व्हि. वाय. काकळीज सर यांनी तात्यासाहेब अर्थात माधवराव बोरस्ते यांनी काकासाहेब वाघ यांच्या प्रेरणेने तत्कालीन शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सहकारी तत्वांचा पुरस्कार केला. शेतकरी सहकारी चळवळ सर्व दूर नेली. निफाड सहकारी साखर कारखाना संपूर्ण देशभरात लौकिकाला पोहोचवला असे मत प्रकट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कवडे आ.ए.यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री.डि.एम.भिलोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

